ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

लालबागच्या राजाचे प्रथमच सायंकाळी 4 वाजता विसर्जन

मुंबई – कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे विसर्जन हा एक मोठा सोहळा असतो कारण विसर्जनासाठी प्रचंड गर्दी असते विसर्जन मिरवणूक निघाल्यावर रस्त्याच्या दुतर्फा दर्शनासाठी लाखो लोक उभे असतात शिवाय लालबाग ते गिरगाव पर्यंतच्या मिरवणुकीसाठी मध्यरात्र होते आणि दुसर्‍या दिवशी पहाटे किंवा सकाळी लालबागच्या राजाचे विसर्जन होते .पण यावेळी मात्र कडक नियमांमुळे राजाची विसर्जन यात्रा दुपारी 12 वाजता निघाली आणि सायंकाळी साडेतीन वाजता गिरगाव चौपाटीवर पोचली . मूर्ति चार फुटांचीच असल्याने तरफ्यावरून मोजक्याच लोकांच्या सहयाने 4 वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले असे पहिल्यांदाच घडत असल्याने गणेश भक्त काहीसे नाराज दिसत होते . यंदा लालबागच्या राजाचे गणेश भक्तांना फक्त ऑन लाइन दर्शन घेता आले

error: Content is protected !!