ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

नक्षलवादा वरील चर्चेच्या निमित्ताने युतीची पुन्हा चाचपणी?


ठाकरे शहा भेटीने राज्याच्या राजकारणाला कलाटणी
दिल्ली/ नक्षलवादाला आळा घालण्यासाठी काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलग्रस्त १० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची जी बैठक बोलावली होती त्या बाठकीनंतर उद्वव ठाकरे आणि अमित शहा यांची वेगळी बैठक झाली या बैठकीत युतीची चाचपणी झाल्याचे समजते त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे
कालच्या नकक्षलवादावरील चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत प्रामुख्याने नक्षलग्रस्त भागाच्या विकासावर भर देण्यात आला त्याच बरोबर शहरी नक्षलवाद वादात असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली महाराष्ट्रातील बहुतेक नक्षलवादी छतिसगढ मध्ये पळून गेले असले तरी उर्वरित नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी सुरक्षेच्या अनेक उपायांची गरज असून त्यासाठी केंद्राने १२०० कोटी द्यावे अशी मागणी u केली दरम्यान मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यात एक वेगळी बैठक झाली त्या बैठकीत युतीच्या चाचपणी बद्दल चर्चा झाल्याची समजते अमित शहा यांनी उद्वव ठाकरे च्या कामाची प्रशंसा केली आणि गेल्या दोन वर्षात गडचिरोली मधील नक्षलवादाला पायबंद घालण्यात उद्वव ठकरे यशस्वी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले .अमित शहा आणि ठाकरे यांच्या युतीच्या चाचपणी बद्दल चर्चा होत असल्याने महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी मध्ये मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे . ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी भाजप नेत्यांना भावी सहकारी म्हटले होते आणि आता अमित शहा यांची स्वतंत्र भेट घेऊन चर्चा केली त्यामुळे राज्यातील राजकारणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे
बॉक्स/ उद्धव ठाकरे दिल्लीला गेलेत हे लक्षात ठेवा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोट निवडणुकीत वेगळी चूल मांडण्याची भाषा करणाऱ्या अजित पवार यांना काल संजय राऊत यांनी इशारा देताना सांगितले की बरोबर आलात तर स्वागत आहे अन्यथा . उद्वव ठाकरे दिल्लीला गेले हे लक्षात ठेवा

error: Content is protected !!