ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
मुंबई

तरुणाईच्या उत्साहावर पाणी नवरात्रोत्सवात गरब्याला परवानगी नाही

मुंबई/ यंदा करोनाने सणांच्या उत्साहावर पाणी फिरले आहे गणेशोत्सव जसा साधेपणाने साजरा करण्यात आला तसाच नवरात्रोत्सव सुधा साधेपणाने साजरा करण्याचे आदेश सरकारने दिले असून गरब्याच्या आयोजनात परवानगी नाकारण्यात आल्याने तरुणाईचा उत्साह मावळला आहे काल सरकारने नवरात्रोत्सवासाठी नियमावली जरी केली त्यात देवीच्या आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणूकीवर बंदी असेल तसेच मंडप सुधा मर्यादित स्वरूपाचे असतील ध्वनिक्षेपक लावण्याबाबत ही वेळेची मर्यादा आणि इतर नियम आहेत
नवरात्रोत्सवात गरबा दांस हे मुख्य आकर्षण असते त्यासाठी तरुणाई देवीच्या मंडपात गरबा डांस खेळण्यासाठी उत्सुक असते पण यंदा मात्र गरबा नसेल

error: Content is protected !!