ऑल इस वेल सर्वकांही पुनर्वत होईल -विनय देशपांडे – डेक्कन एज्युकेशन सोसायटी मुंबई कॅम्पस, एन आय पी एम यांच्या संयुक्त विद्यमाने एच आर शिखर परिषद ४.० धडाक्यात संपन्न
मुंबई : . चौथ्या औद्योगिक क्रांतीचे (4 IR) चे वर्णन बऱ्याचदा येऊ घातलेलं वादळ असं केलं जातं. प्रचंड वेगाने येणाऱ्या ह्या क्रांतीने होऊ घातलेल्या बदलांना सामोरे जाण्यासाठी एचआर शिखर परिषद एकदिवसीय पॉवरपॅक सत्र औदयोगिक क्रांती ४. ० मध्ये मानव संसाधन शिखर सम्मेलन एच आर ४. ० च्या डेक्कन एनआयपीएम मुंबई चॅप्टरच्या सहयोगाने डीईएस कॅम्पसने ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. एडुकेशन सोसायटी (डीईएस) मुंबई कॅम्पस व एनआयपीएम मुंबई चॅप्टर त्याच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, ९ ऑक्टोबर २०२१ रोजी, सकाळी १०. ३० ते दुपारी 2. ३० पर्यंत कालावधीत कीर्ती कॉलेज कॅम्पस येथे ही शिखर परिषद धडाक्यात संपन्न झाली
आभासी (व्हर्चुअल) आभासी (व्हर्चुअल) कार्य करा, डिजिटल पद्धतीने सुरक्षित कार्यस्थळ तयार करा, उद्योगांना अधिक कार्यशील बनवा या उद्देशाने त्यामध्ये १. विविधता आणि सर्वसमावेशकता याची नवी परिमाणं, २.आभासी (व्हर्चुअल )मनुष्यबळ आणि सायबर सुरक्षा हे विषय घेण्यात आले .
चौथ्या औद्योगिक क्रांतीचे (4 IR) चे वर्णन बऱ्याचदा येऊ घातलेलं वादळ असं केलं जातं. प्रचंड वेगाने येणाऱ्या ह्या क्रांतीने होऊ घातलेल्या बदलांना सामोरे जाण्यासाठी. एचआर शिखर परिषदेतील एकदिवसीय पॉवरपॅक सत्र. एच आर प्रोफेशन साठी एक अद्ववतीय संधी मिळाली होती. एच आर करायला प्रवत्तृ करणारे विषय, दोन पॅनलमधील विचारांची देवाण घेवाण ,एच आर सोबत नेटवर्क हि ह्या कॅम्पस इव्हेंटची वैशिट्ये होती.
प्रमुख वक्ते श्री. विनय देशपांडे यांनी मार्गदर्शन करताना नमूद केले की जरी तंत्रज्ञानामुळे, साथीच्या आजारामुळे आणि इतर अनेक घटकांमुळे व्यत्यय येत असला तरी माणूस बदलांना बऱ्यापैकी जुळवून घेतो. त्यांच्या मते ऑल इस वेल सर्वकांही पुनर्वत होईल.फिजीटल हा एक शब्द आहे जो भौतिक आणि डिजिटल जगातील विभाजनाचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. त्यांनी HR च्या भविष्यासाठी इनोव्हेशन स्पेस वापरण्याचे आवाहन केले.
परिसंवादामध्ये पॅनेल चर्चेसाठी मान्यवरांची मते व्यकत केली त्यात डॉ नीरव मंदिर, मुख्य मानव भांडवल अधिकारी – श्री रामकृष्ण एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड. सुश्री हरीनी श्रीनिवासन, भागीदार – सेमकोस्टाइल इन्स्टिट्यूट इंडिया. आशिष बंका, एचआर डायरेक्टर – दिल्लीवेरी. विलास भालेराव उपाध्यक्ष एचआर कोलसाईट ग्रुप. अरविंद वॉरियर, मानव संसाधन संचालक, रॅपिडव्हॅल्यू सुश्री गौरी दास, हेड एचआर – इंडिया फॅक्टरिंग अँड फायनान्स. डॉ.संजीव चौहान, संचालक एचआर पेपे जीन्स इंडिया लिमिटेड
श्री तामिळसेल्वन महालिंगम, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक – फ्यूचर कैप्टन -श्री किरण बाबु संचालक – सोलुशन सेल्स, सॅाफ्टलाईन इंडिया
या शिखर संमेलनाचे सूत्रसंचालन डॉ. अरुणा देशपांडे माननीय खजिनदार, एनआयपीएम आणि पॅनल चर्चेचे संचालन डीईएस कॅम्पसच्या डॉ कस्तुरी नाईक, डॉ रेणुका सावंत आणि श्रीमती मारीया आचारी यांनी केले.
डीईएस मुंबई कॅम्पसची ६७ वर्षांची परंपरा आहे. संस्थेच्या मुबई कार्यक्षेत्रात तीन संस्था आहेत – कीर्ती एम दुंगुर्सी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय जे मुंबई विद्यापीठाशी संलग्न एक पदवीधर महाविद्यालय आहे. नवीनचंद्र मेहता इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट जे मुंबई विद्यापीठाचे MCA एमसीए(मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन) आणि MMS एमएमएस (मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज) देणारी पदव्युत्तर संस्था आहे. जयश्री कोठारी बिझनेस स्कूल जी AICTE शी संलग्न एक स्वायत्त संस्था आहे जी PGDM (डेटा अनॅलिटिक्स आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वर लक्ष केंद्रित करून व्यवसाय व्यवस्थापन मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा हा अभ्यासक्रम शिकविला जातो.