ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
विश्लेषण

रेखाताई बोऱ्हाडे यांच्या ‘ओंजळीतील फुले’ पुस्तकाचे आज प्रकाशन ; वीरमाता अनुराधा गोरे आणि मंगलाताई खाडिलकर यांचे मार्गदर्शन

                  मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, राजा शिवछत्रपती परिवारच्या मुंबई संपर्क प्रमुख सौ. रेखाताई बोऱ्हाडे यांनी लिहिलेल्या विविध लेखांचा संग्रह असलेले ‘ओंजळीतील फुले’ हे पुस्तक उद्या, शनिवार, २३ ऑक्टोबर २०२१ रोजी कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यात येऊन एका छोटेखानी समारंभात प्रकाशित करण्यात येणार आहे.  शहीद कँप्टन विनायक गोरे यांच्या मातोश्री वीरमाता अनुराधा गोरे, सुप्रसिद्ध संवादिनी मंगलाताई खाडिलकर यांच्या शुभहस्ते आणि कस्तुरबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील मागाठाणे पोलीस बीट चौकीजवळील सभागृहात सायंकाळी साडेचार वाजता ‘ओंजळीतील फुले’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. 

error: Content is protected !!