बायोमेट्रिक हजेरी हा पालिका कामगारांवर सत्ताधारी शिवसेनेकडून अन्याय
मुंबई/ कोविड काळात बंद केलेली बायोमेट्रिक हजेरी हा पालिका कर्मचाऱ्यांवर अन्याय असून सत्ताधारी शिवसेनेने त्याचा फेरविचार करावा अशी मागणी केली जास्त आहे.
मुंबई महानगर पालिकेत चौर्थ श्रेणीतील कर्मचारी वर्ग पासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत बहुसंख्य मराठी कर्मचारी आहे आणि शिवसेना ही मराठी माणसांसाठी स्थापन झालेली आहे असे असताना आज शिवसेनेची पालिकेत सत्ता असताना पालिकेतील कामगारांवर बायोमेट्रिक हजेरी ची सक्ती का ? असा सवाल मुंबई जनसत्ता कडे अनेक कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला.सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक आणि विविध वैधानिक समित्यांचे नगरसेवक महासेभेसाठी किंवा समित्यांच्या बाठकिसाठी किती वेळेवर येतात ? हे अगोदर त्यांनी सांगावे आणि नंतरच बायो मेट्रिक हजेरी बाबत आग्रह धरावा .मुंबई जनसत्ता याबाबत लवकरच पालिका कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया प्रसिद्ध करून या अन्याय विरुद्ध आवाज उठवणार आहे.