पंतप्रधान गरीब अन्न कल्याण योजनेची मुदत वाढवली
दिल्ली/ लॉक डाऊन काळात सर्व बंद असल्याने केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब अन्न कल्याण योजना सुरू केली होती या योजने अंतर्गत गरिबांना मोफत गहू तांदूळ दिले जात होते.या योजनेची मुदत डिसेंबर पर्यंत होती पण ती आता मार्च२०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे.त्यामुळे या योजनेतील गरीब लाभार्थीना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना जरी काही प्रमाणात आटोक्यात आला असला तरी नवा विषाणू ओमॉक्रोन मुळे परिस्थिती चिंताजनक बनण्याची स्थिती आहे कारण देशात ओमाय क्रोन चे रुग्ण वाढू लागलेत त्यामुळे पुन्हा निर्बंध लावण्याची पाळी येऊ शकते अशावेळी गरिबांवर उपासमारीची पाळी येऊ नये मम्हणून या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे