ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्या

माथेरान मध्ये पर्यटक महीलेची गळा चिरून निर्घुण हत्या! महीलेचे मुंडकेच गायब;माथेरान पोलिस ठाणेत गुन्हा नोंद! प्रियकरानेच खुन करुन मुंडके नेलेचा संशय!

कर्जत- जगप्रसिद्ध असणारे माथेरान थंड हवेचे ठिकाणी आज पर्यटक महीलेची गळा चिरून निर्घुंण हत्या झाल्याची घटना येथिल खाजगी लॅाजमधे घडली आहे. या घटनेने संपुर्ण माथेरान शहरात खळबळ माजली असुन या घटेनेची नोंद माथेरान पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान या महीलेचे शीर कापुन गायब करण्यात आले असुन या मयत पर्यटक महीलेची ओळख पटविणे माथेरान पेलिसांसमोर आवाहन बनले आहे. पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत. तसेच या महीलेचे या लॅाजचा नोंद वहीत महीलेचे नाव रुबिना बेन व सोबत असलेल्या व्यक्तीचे अमजद खान अशी खोटी माहीती भरली असल्याचे पोलिसांना दिसुन येते. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेने माथेरान हादरले आहे.
या बाबत अधिक माहीती अशी की, कर्जत तालुक्यांतील माथेरान पर्यटन स्थळ जगप्रसिद्ध आहे. जगातून या पर्यटनस्थळी रोज हजारो पर्यटक माथेरान येथे थंड हवेचा आस्वाद घेणेसाठि येत असतात, मात्र काल शनिवारी अशाच प्रकारे एक महीला आपल्या प्रियकरासोबत संध्याकाळचा सुमारास माथेरान मध्ये आल्याचे सांगणेत येते. हे जोडपे येथिल इंदिरा गांधी नगर येथे खाजगी लॅाजमधे राहीले होते. आज सकाळी ११ वाजताचा सुमारास माथेरान शहरातील या खाजगी लॅाजमधे या महीलेचा विवस्र अवस्थेत मुंडके नसलेला म्रुतदेह सापडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येथे या फिरायला आलेल्या महीलेचे मुडंकेच कापुन नेणेत आले आसल्याने सारेच सुन्न झाले आहेत. या घटनेने माथेरान शहरात या एकच खळबळ उडाली आहे.
माथेरान शहरात रोज अनेक पर्यटक फिरायला येत असतात, अशातच या ठिकाणी पर्यटनासाठी आलेल्या एका महीलेचा म्रुतदेह माथेरान रेल्वे स्थानकासमोरील लॅाजचा बंद खोलीत या म्रुतदेह आढलुन आला आहे. साधरणता ही महीला २७ वर्षाची असल्याचे दिसुन येते. या महीलेचा म्रुतदेहाचा मुंडकेच गायब होते, तर तिच्या अंगावर कपडेही नव्हते. त्यामुळे या महीलेसोबत फिरायला आलेल्या व्यक्तीनेच तिचे मुंडके कापुन सोबत नेले असण्याचे बोलले जाते.ही घटना काल रात्री उशीरा घडली असण्याची चर्चा सुरु आहे.
विशेष म्हणजे या महीलेचा म्रुतदेह जी ठिकाणी आढलुन आला आहे, त्या ठिकाणी नागरिकांची वर्दल कमी असते अशी माहीती माथेरानमधुन समजते आहे. तसेच या महीलेबरोबर एक पुरुषही फिरायला आला होता, मात्र तो गायब झाला आहे, त्यामुळे या महीलेचा खुन त्यानेच केल्याचे अंदाज वर्तविला जातो. या महीलेचा म्रुतदेह सापडलेल्या ठिकाणी कोणतेही साहीत्य आढलुन आले नाही. त्यामुळे या महीलेची ओळख पटविणे मोठे आवाहन पोलिसांसमोर आसल्साचे पोलिस सुत्रांकडुन समजते आहे.
दरम्यान या घटनेची नोंद माथेरान पोलिस ठाण्यात करणेत आली असुन या घटनेचा अधिक तपास माथेरान पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक श्री. बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली माथेरान पोलिस करीत आहेत. तसेच घटनास्थळी कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिली असुन तपासाबाबत पोलिसांनी सुचना दिल्या आहेत. तसेच कर्जतचा पोलिसी निरीक्षक सौ. सुवर्णा पत्की यांनी ही भेट दिली. ही हत्या कोणी व का केली असावी? याबाबत सारेच अनभिज्ञ असले तरीही या महीलेसोबत आलेल्या व्यक्तीनेच हा खुन केल्याचा कयास बांधला जात आहे. या खुनाचा लवकरच माथेरान पोलिस उलगडा करणार असल्याचा विश्वास माथेरान पोलिस व्यक्त करीत आहेत.

error: Content is protected !!