रेल्वेच्या हद्दीतील झोपडपट्ट्या बाबत सर्वोच्च न्यायालयाचे कडाक ताशेरे
दिल्ली/ रेल्वेच्या हद्दीतील वाढत्या झोपडपट्ट्या आणि अतिक्रमण याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांमधील महापालिका वर काडक ताशेरे ओढले आहेत
गुजरात,हरयाणा आणि पंजाब मधील तीन याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंड पीठाने रेल्वेची सुधा कडकं शब्दात कानउघाडणी केली शहरात आणि खास करून रेल्वेच्या हद्दीत बेकायदेशीर झोपडपट्ट्या तयार होतातच कशा स्थानिक प्रशासन काय करीत असते अतिक्रमणावर कारवाई का करीत नाही अशी विचारणा केली याबाबत केंद्राने लक्ष घालावे असे निर्देश सुधा न्यायालयाने दिले आहेत.
रेल्वेच्या हद्दीत सर्वाधिक झोपड्या महाराष्ट्रात आहेत त्याच्या खालोखाल गुजरात मध्ये आहेत यावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करीत संबंधित प्रशासनाला खडे बोल सुनावले.