अर्थकारणाचे काँक्रीट पूर्ण न झाल्याने आपल्याच बालेकिल्ल्यात १४ रस्त्यांच्या कामात स्थायी समितीचा स्पीड ब्रेकर
मुंबई/ पैशापुढे नीतिमत्ता,निष्ठा आणि कधी कधी पक्षाचाही काही लोक विचार करीत नाहीत म्हणूनच तर पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने जी दक्षिण आणि एफ दक्षिण विभागातील १४ रस्त्यांचे २७ कोटींचे प्रस्ताव अडवून ठेवले आहेत.भाजपने हे प्रकरण उघडकीस आणताना शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत.विशेष म्हणजे ज्या भागातील रस्त्यांच्या कामाचे प्रस्ताव अडवलेत त्यात लालबाग, परळ,काळाचौकी, लोअर परळ यासारखे शिवसेनेचे बालेकिल्ले असून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,आमदार अजय चौधरी आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सारखे दिग्गज शिवसेना लोकप्रतिनिधी आहेत .सोमवारच्या बैठकीत रस्ते कामांच्या प्रस्ताव सह हा प्रस्ताव मंजूर व्हायला हवा होता पण तो मंजूर न करता राखून ठेवला त्यामुळे अर्थपूर्ण कारणांसाठीच हा प्रस्ताव राखून ठेवण्यात असल्याचा आरोप आता या भागातील जनता करीत आहे.त्यामुळे या प्रस्तावाच्या बाबतीत आता स्थायी समिती मधील सत्ताधारी पक्षाचे जे कलेक्शन एजंट आहेत ते निवडणुकीच्या तोंडावरच संशयाच्या चक्रव्यूहात सापडले आहेत आणि लालबाग परळ मधला मराठी माणूस त्यांना निवडणुकीत अद्दल घडवण्यााठी सज्ज आहे अशी संतप्त प्रतिक्रिया या भागातील लोक व्यक्त करीत आहेत