ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

मेट्रोच्या गोरेगाव येथील कामात-एम् एम आर डी ए चा सावळा गोंधळ

मुंबई (किसन जाधव) मुंबईतील मेट्रोच्या दुसर्‍या टप्प्याचे काम आता पूर्णत्वाकडे आहे मात्र या कामातील कंत्राटदारांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अनेक चुका होत आहेत आणि त्याकडे एम एम आर डी ए चे अधिकारी हेतुपुरसकर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मुंबईकर करीत आहेत .कोणत्याही नागरिक सुविधांच्या सुरू असलेल्या कामांची नागरिकांना माहिती मिळण्यासाठी त्या ठिकाणी फलक लावले जातात त्यावर कंत्राटदाराचे नाव,कामाचा कालावधी आदींची माहिती असावी असा नियम आहे. मात्र गोरेगांव आरे कालणी येथे मेट्रोच्या पिलर नजिक एक किमी रस्त्याचे जे काम सुरू आहे तिथे नियमांची पायमल्ली सुरू असून जी एल कंपनीकडे हे काम आहे मात्र कंत्राटदार आणि कामाच्या इतर बाबी संबंधीची माहिती असलेला कोणताही फलक तेथे नाही. बेरेकेटींग नाही त्यामुळे अपघात होत आहे. या कामात जर काही त्रुटी किंवा तक्रारी असतील तर कोणाला जाब विचारायचा असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शिवाय रस्त्याच्या कामासाठी जो खड्डा खोदून ठेवलंय त्याच्या भोवती बरेकेट्स सुधा लावलेले नाहीत उद्या समजत त्यात कुणी पाडून मेळा तर त्याची जबाबदारी एम एम आर डी ए चे अधिकारी घेणार आहेत का ? एम एम आर डी ए हे प्राधिकरण मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली येते त्यामुळे एम एम आर डी ए झालेल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टींची जबाबदारी अर्थातच मुख्यमंत्र्यांवर येऊ शकते म्हणूनच एम एम आर डी ए चां संबधित अभिंयता नेरकर आणि अन्सारी अधिकार्‍यांनी इथे लक्ष घालून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे

error: Content is protected !!