ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्र

मंत्र्यांच्या बंगल्याना किल्ल्यांची नावे पण प्रत्यक्ष किल्ल्यावरच्या अतिक्रमणं आणि दुरवस्थेची काय?

मुबई/ महाराष्ट्रातले गड किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांचा महान पराक्रमाचे आणि शिवशाहीच्या गौरवशाली इतिहासाची साक्षीदार आहेत पण पुरातत्व विभागाचा आडमुठेपणा आणि महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष यामुळे महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या ३०० किल्ल्यांची दुरवस्था झालेली आहे तर काही ठिकाणी मुस्लिमांनी अतिक्रमण करून थडगी बांधलेली आहेत तेंव्हा ही अतिक्रमणे काढून या किल्ल्यांचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्याचे सोडून सरकारने मंत्र्यांच्या बांगल्याना किल्ल्यांची नावे देण्याचा जो निर्णय घेतला आहे तो हास्यास्पद आणि महाराजांबद्दल दाखवलेला खोटा आदर आहे अशी संतप्त प्रतिक्रिया शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे. पाली येथील सरस गडावर २०/२५ वर्षांपूर्वी थडगे बांधण्यात आले आता तिथे मुस्लिम नियमित उरूस भरवतात तर मंगळवार असलेल्या थडग्यावर चादर चाडवली जाते .हिरालोट येथे अगोदर थडगे बांधून आता त्याच्या बाजूला भिंती उभारून त्याचे दर्ग्यात रूपांतर करण्यात आले आहे. हिरकोट गडाचा सध्या कारागृह म्हणून वापर केला जातो. शिवडीतील दर्गा हे नवनाथ पैकी एका नाथाचे ठिकाण आहे असे वयोवृध्द जाणकारांचे मत आहे. शिवडीचा किल्ला १५०० वर्ष पुरातन आहे या किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर सय्यद जळल शाह दर्ग्याचे प्रस्थ वाढले आहे किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर साधारण एक एकर जागेवर दर्गा शरीफ हजरत सय्यद जलाल शहा या नावाने दर्गा आहे तिथेही अनधिकृत बांधकामे झाली आहेत. महाराजांच्या इतर किल्ल्यांची सुधा दुरवस्था झालीय त्याकडे लक्ष देण्यास ऐवजी मंत्र्यांच्या बंग्ल्याना किल्ल्यांची नवे कशासाठी असा सवाल केला जात आहे.

error: Content is protected !!