ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

पेगासिस वरून काँग्रेस भाजपामध्ये राडेबाजी

मुंबई/ पेगासिस हेरगिरी प्रकरणावरून काल मुंबईत काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते मुंबईच्या दादर मध्ये आमनेसामने आले आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री झाली जर पोलीस मध्ये पडले नसते तर या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी राडेबाजी झाली असती आणि या राडे बजीचे देशभर तीव्र पडसाद उमटले असते
पेगासिस हे एक स्पयवेर सॉफ्टवेअर असून त्याचा भाजपा सरकारने विरोधक तसेच उद्योगपतींची हेरगिरी करण्यासाठी वापर केला होता असा आरोप काँग्रेस सह सर्वच विरोधी पक्षाने केला होता २०१७ सालि पंतप्रधान मोदी हे इस्त्राईल दौऱ्यावर गेले होते तेंव्हा दोन्ही देशात एक शस्त्रास्त्र खरेदीची डील झाली होती या डील सोबतच इस्त्राईल कडून पेगासीस हे हेरगिरी करणारे स्पाय वेअर खरेदी करण्यात आले आणि त्याद्वारे देशातील काही प्रमुख विरोधी पक्ष नेते आणि उद्योगपतींची हेरगिरी करण्यात आल्याचे उघडकीस आले त्यावरून संसदेत अनेक वेळा गोंधळ झाला सरकारने विरोधकांचे सर्व आरोप फेटाळले होते .त्यानंतर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे मात्र संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच काँग्रेसने पुन्हा हे प्रकरण उकरून कडले आणि मुंबईत झिशन अल्लीच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयावर मोर्चा काढला मात्र हे समजताच प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे कार्यकर्ते भाजपा कार्यालयाजवळ जमले आणि दोन्ही कडच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांच्या विरुद्ध घोषणाबाजी सुरू झाली तसेच प्रकरण हातघाईवर येऊन धककबुक्की सुरू झाली दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी येऊन दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना हतवले आणि काहींना ताब्यात घेतले या घटनेमुळे सध्या काँग्रेस भजपत तणावाचे वातावरण आहे

error: Content is protected !!