पुण्यात मॉल चां स्लॅब कोसळून ७ बिहारी मजुरांचा मृत्यू
पुणे/ आजकाल रात्री उशिरा पर्यंत इमारतींचे बांधकाम सुरू ठेऊन बांधकाम मजुरांना अक्षरशः गुलाम सारखे वागवले जाते मात्र युपी बिहार आणि पश्चिम बंगाल मधून पोट भरण्यासाठी महाराष्ट्रात आलेले मजूर नाईलाजाने बारा बारा तास काम करतात पुण्याच्या एरवडा भागात अशाच बांधकाम मजुरांवर काळाने घाला घातला असून निर्माण धिन मॉलचा स्लॅब कोसळून ७ मजूर ठार झाले तर तिघे जखमी झाले आहेत
येरवडा भागातील शास्त्री नगरात वाडिया बंगल्या जवळ एका मॉलचे बांधकाम सुरू आहे गुरुवारी रात्री १०.४५ वाजता बेस्मेंट मध्ये काही कामगार स्लॅब चां सल्या लावण्याचे काम करीत असताना संपूर्ण स्लॅब त्यांच्या अंगावर कोसळला आणि लोखंडी सल्या त्यांच्या शरीरात घुसून पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला या दुर्घटनेत ३ कामगार जखमी झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन स्लॅब चा ढिगारा हटवला आणि गॅस कटरच्या साहाय्याने मृतदेहाच्या शरीरात अडकलेल्या सळ्या कापून मृतदेह बाहेर काढले हे सर्व बिहारी मजूर असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे दरम्यान या घटनेबद्दल मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांचा कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे .तसेच जखमींचा सर्व खर्च सरकार करणार असून त्यांनाही आर्थिक मदत दिली जाणार आहे तसेच या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत
बॉक्स
पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख
पुण्यातील दुर्घटना ही अत्यंत दुर्दैवी असून मृतांचा कुटुंबियांच्या प्रति मी संवेदना व्यक्त करतो तसेच भविष्यात अशा दुर्घटना घडणार नाही याची संबंधितांनी काळजी घ्यायला हवी असेही पंत प्रधान मोदी यांनी म्हटले आहे