आघाडी सरकार मधील गृहकलह
आघाडी सरकार म्हटल की त्याला अनेक मर्यादा असतात कारण एकापेक्षा अनेक पक्षाच सरकार चालवताना तारेवरची कसरत करावी लागते.सध्या केंद्रात आणि राज्यात सुधा आघाडी सरकार आहे.केंद्रात भजपाचे बहुमत असेल तरी सरकार मात्र एन डी ए आघाडीचे आहे पण भाजपा बहुमतात असल्याने मोदींची एकतर्फी हुकूमत सुरू आहे पण महाराष्ट्रामध्ये मात्र तसे नाही महारष्ट्र मध्ये जरी तीन पक्षाच्या महा विकास आघाडीचे सरकार असेल तरी त्यातील कुठल्याही एका पक्षाच्या मागे स्पष्ट बहुमत नाही .त्यामुळे या महा विकास आघाडीच्या सरकारमध्ये कलह सुरू आहे अगदी सरकारची स्थापना झाल्यापासून हा कलह आहे .ज्याप्रमाणे पूर्वी सेना भाजपचे युती सरकार असताना दोन्ही पक्षात कलह सुरू होता तसाच आताच्या महा विकास आघाडी सरकारमध्ये वेग वेगळ्या कारणांवरून गृह कलह सुरू आहे.यावेळी महाविकास आघाडीत गृह खात्यावरील कलह सुरू आहे.कारण शिवसेना भाजपतील जी संघर्ष सुरू आहे त्यात शिवसेनेला गृहखात्याची साथ मिळत नसल्याने शिवसेना भयंकर नाराज आहे .आणि म्हणूनच शिवसेनेला गृहखात हवं आहे.तास पाहता गृहमंत्री हा खमक्या असावा लागतो.राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखताना त्याचा पोलीस खात्यावर वचक असावा लागतो मात्र सध्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे पेशाने सरकारी नोकरशहा असल्याने त्यांना आदेश देण्याची नाही तर आदेश झेळण्याची सवय आहे.शरद पवारांनी त्यांना नोकरशाही मधून उचलून राजकारणात आणले .त्यामुळे शासकीय सेवेतून राजकारणात आलेल्या मनमोहन सिंग यांची जी अवस्था झाली तीच वळसे पाटलांची आहे.महाराष्ट्रासारख्या मोठ्या आणि संवेदनशील राज्याचा गृहमंत्री म्हणून ते अजिबात शोभत नाही.गृहमंत्री पदावर अजितदादा किंवा बच्चू कडू सारखा खमक्या माणूस पाहिजे होता किंवा मग मुख्यमंत्री उधवं ठाकरे यांनी स्वतः कडे गृहखाते ठेवायला हवे होते.पण त्यांनी तसे केले नाही.कारण आघाडी सरकारं चालवायचे होते ते टिकवायचे होते म्हणून मुख्यमंत्री ठाकरे यांनी गृह खाते स्वतःकडे घेतले नाही हा त्यांचा समजूतदारपणा होता पण जर गृहमंत्री कमकुवत असेल आणि त्यामुळे सरकारमध्ये सामील असलेल्या पक्षांना त्याच्या कमकुवतपणा चां त्रास होत असेल तर गृहमंत्री बदलायलाच हवा.आणि तो बदलला तरच महा विकास आघाडी मधील गृहकलह शांत होईल ,
तसे पाहता शिवसेनेने गृहमंत्री पदाची केलेली मागणी योग्यच आहे. कारण भारतीय जनता पक्षाकडून ज्या पद्धतीने आज महा विकास आघाडीच्या मागे तपास यंत्रणांचां सासेमिरा लावण्यात आला आहे ते पाहता महाराष्ट्र सरकारकडूनही भाजप वर पलटवार होणे आवश्यक होते आणि त्यासाठी गृह खात्याचे सहकार्य अपेक्षित होते कारण केंद्राकडे ज्याप्रमाणे ई डी ,सीबीआय सारख्या तपास यंत्रणा आहे तशाच राज्य सरकारकडे सुधा पोलीस,सी आय डी ,राज्य गुप्तवार्ता विभाग यासारख्या तपास यंत्रणा आहेत.पण गृह खात्याने भाजपच्या विरोधात त्यांचा योग्य वापर केला नाही .आणि शिवसेनेचे हेच दुःख आहे शिवसेनेच्या काही नेत्यांनी भाजपच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी करूनही त्या तक्रारींची दखल घेतली गेली नाही अशावेळी आमचे सरकार असूनही जर आमच्या तक्रारींची दाखल घेत नसेल तर काय उपयोग अशी भावना सेना नेत्यांच्या मनात निर्माण होणे स्वाभाविकच आहे.कारण महाविकास आघाडीच्या नेत्यांना जर केंद्रीय तपास यंत्रणा त्रास देत असतील तर महाराष्ट्रातल्या तपास यंत्रणानी सुधा भाजपच्या लोकांच्या भानगडी बाहेर काढायला हव्या होत्या त्यांची चौकशी करायला हवी होती कारण भाजपचे नेते सुधा धुतल्या तांदळासारखे नाहीत.त्यांनीही सत्ता असताना काहीतरी झोल झपाटे केलेले असतीलच! मग महाराष्ट्राचे गृह खाते आणि पोलीस यंत्रणा गप्प का ? याचे कारण असे की महाराष्ट्राला सक्षम गृहमंत्री नाही .महाराष्ट्राला अजित पवार,जितेंद्र आव्हाड,एकनाथ शिंदे किंवा नाना पटोले यांच्यासारखा गृहमंत्री आता तर महाराष्ट्राची बदनामी करण्याची कुणाची हिम्मत झाली नसती.आणि आघाडीत गृहकलह सुधा निर्माण झाला नसता.अजूनही वेळ गेलेली नाही दिलीप वळसे पाटील यांच्या जागी चांगल्या खमक्या माणसाला गृहखाते देऊन महा विकास आघाडीने भाजप वर पलटवार करावा आणि गृहखात्याच्या माध्यमातून भाजपा नेत्यांच्या सुधा कुंडल्या बाहेर खाड्याचे तरच सोमय्या सारख्या पोपटा ची पोपटपंची बंद होईल.मात्र हे जर घडले नाही तर भाजपचे लोक केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अशी काही बदनामी करतील की त्यांना महाराष्ट्रात तोंड दाखवायला जागा राहणार नाही