ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

महाराष्ट्र आणि मुस्लिम समाजानेही टाकला सुटकेचा निःश्वास


मनसेची आजची राज्यव्यापी महा आरती रद्द
मुंबई/ भोंगे आणि हनुमान चाळीसच्या वादाने अगोदरच महाराष्ट्रातील वातावरण तापलेले असताना आज रमजान ईदच्या दिवशी च मनसेने महाराष्ट्रातील सर्व मंदिरांमध्ये आरती करण्याचा निर्णय घेतलेला होता पण नंतर तो रद्द करण्यात आला दुसऱ्याच्या सणात विघ्न नको म्हणून कुणीही 3 मे रोजी महाआरती करू नये पुढे काय करायचे ते मी ट्विट करून सांगेन असे पत्रक राजने काडले त्यामुळे आजची महाआरती रद्द झाली
औरंगाबाद येथील राज ठाकरेंच्या सभेत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यंच्या बाबतीत 4 तरिखचा अल्टिमेट दिला आहे.चार तारखेला मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत तर मशिदीच्या समोर दुप्पट आवाजात भोंगे लाऊन हनुमान चालीसा पठण केला जाणार आहे.तसेच आज ईदच्या दिवशीच मनसेने राज्यभरातील मंदिरांमध्ये महारतीचा कार्यक्रम हाती घेतला होता स्वतः अमित ठाकरे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात महाआरती करणार होते. या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवून वातावरण बिघडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी तुमच्यावर असेल असा इशारा दिला होता तर दुसरीकडे एम आय एम चे खासदार इम्तियाज जलील आणि इतर मुस्लिम पुढाऱ्यांनी राज ठाकरेंवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे कारवाई न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे त्यामुळे महाराष्ट्रातले वातावरण चांगलेच तापले आहे .सरकार मात्र वातावरण बिघडन्यायावर कारवाई करण्याची भाषा करीत आहे .त्यासाठी राज ठाकरे यांच्या औरंगाबाद मधील सभेचे फुटेज मागवण्यात आले असून ते तपासल्यानंतर त्यात राजच्या सभेसाठी घातलेल्या 16 अटीपैकी किती अटींचे उल्लंघन झाले हे तपासून कारवाई केली जाईल असे औरंगाबादचे पोलीस आयुक्त गुप्ता यांनी सांगितले आहे .

error: Content is protected !!