ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

नवी मुंबईत अग्नी तांडव

पावणे एम आय डी सी मध्ये 8 कंपन्यांना भीषण आग केमिकलच्या डूमचे स्फोट

नवी मुंबई/ ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अनेक कंपन्यांमध्ये बेकायदेशीर रित्या वाजवीपेक्षा अधिक केमिकलचा साठा ठेवला जात आहे आणि त्याकडे कंपनी सुरक्षा यंत्रणांचे आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सातत्यानं दुर्लक्ष होत असल्याने आगीच्या घटना घडत आहेत काल नवी मुंबईच्या पावणे एम आय डी सी मध्ये लागलेल्या आगीत 8 कंपन्या जाळून भस्मसात झाल्या
पावणे एम आय डी सी मध्ये अनेक केमिकल कंपन्या आहेत आणि त्या एकमेकांच्या अगदी जवळ आहेत.या कंपन्यांमध्ये सुरक्षा विषयी पुरेशी उपकरणे नसल्याने अधून मधून आगीच्या घटना घडत असतात काल पावणे एम आय डी सी मधील वेस्ट क्लाय पोलिकॅब नावाच्या केमिकल कंपनीला आग लागली आणि हा म्हणता ही आग सर्वत्र पसरली अग्नि शमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी आल्या आणि त्यांनी प्रथम आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर कडून त्यांचा जीव वाचवला पण केमिकल्मुळे आग पसरली आणि आजूबाजूच्या 9 कंपन्या जाळून खाक झाल्या आग लागल्यानंतर केमिकलचे ड्रम उडून त्यांचा स्फोट होऊ लागला त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे या आगीत किती जीवित हानी झाली याची माहिती मिळू शकली नाही मात्र रात्री उशिरा आग विझवण्यात आली आता या आगीची चौकशी सुरू आहे

error: Content is protected !!