ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

महाविकास आघाडीच्या मागे ई डी चां ससेमीरा कायम -अनिल परब यांच्या घरावर धाड


मुंबई/ महाविकास आघाडी सरकार पाडण्यात अपयशी ठरलेल्या भाजपला आता सुडाच्या राजकारणातून महाविकास आघाडीला आणि खास करून शिवसेनेला संपवायचे आहे आणि म्हणूनच आता आणखी एका मंत्र्याच्या घातला ईडी ची सीडी लावण्यात आली आहे
परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या घरावर मनी लॉडरिंग प्रकरणी छापे टाकण्यात आले.मुंबई पुणे आणि रत्नागिरी अशा तीन ठिकाणी हे छापे टाकण्यात आले.अनिल परब यांच्या दापोली येथील रिसॉर्टच्या खरेदीविक्री मध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार किरीट सोमय्या यांनी केली होती . या प्रकरणी ई डी ने अनिल परब याना समन्स बजावून सुधा ते चौकशीला आले नाहीत त्यामुळे काल सकाळी त्यांच्या मुंबईतील अजिंक्यतारा या शासकीय निवासस्थानी तसेच बांद्रा येथील खाजगी निवासस्थानी धाड टाकण्यात आली तसेच दापोली मधील रिसॉर्ट ची जागा ज्या साठे नावाच्या इस्माकडून परब यांनी खरेदी केली त्या साठेच्या पुण्यातील कोथरूड येथील निवासस्थानी धाड टाकण्यात आली . तसेच परब यांचे सहकारी संजय कदम,व्यावसायिक पार्टनर ऋत्विक यांच्याही घरांवर धाड टाकण्यात आली एकूण 7 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या या धाडीत पोलीस खात्यातील उपायुक्तांच्या बदल्यांप्रकरणी काही महत्वाची कागदपत्रे मिळाल्याचे समजते तसेच सचिन वाजे याने बादल्या प्रकरणात अनिल परब यांचेही नावं घेतले होते आणि आता कागदपत्रे सापडल्याने परब यांच्या अडचणी वाढल्या आहेत

error: Content is protected !!