मुंबईसह 14 महापालिकांची आरक्षण सोडत 31 मे रोजी
मुंबई/ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली असून मुंबईसह ठाणे,वसई विरार,उल्हासनगर,कल्याण डोंबिवली,आदी 14 महापालिकांचे आरक्षण 31 मे रोजी काढले जाणार आहे यात अनुसूचित जाती ( महिला),अनुसूचित जमाती ( महिला) आणि सर्वसाधारण महिला वर्गाचा समावेश आहे त्यानंतर या आरक्षण सोडतीवर सूचना आणि हरकती मागवल्या जातील आणि पुढची प्रोसिजर सुरू होईल त्यामुळे निवडणूक आयोग एन पावसाळ्यात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करणार आहे