माजी महापौर यांच्या वॉर्डांत एस.आर.ए प्रकल्पात नागरिकांची फसवणूक- भाजपने आवाज उठवला
मुंबई/ मोठ्या घरचे पोकळ वासे असे जे म्हटले जाते ते काही खोटे नाही कारण मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या वार्ड क्रमांक 206 मधील एस आर ए प्रकल्पातील रहिवाशांना बिल्डरकडून अनेक महिन्यांपासून भाडीच दिली जात नाहीत .याबाबत किशोरी पेडणेकर आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे सतत पाठपुरावा करूनही काही उपयोग होत नाही .याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले की बिल्डरने दलाल नेमले तेच सर्व कामे पाहतात आणि हे दलाल संपर्कातील लोकांना त्यांना ज्यांच्या कडून कमिशन मिळते .त्याच घरमालकाला बिल्डरकडून भाडे दिले जाते आता या प्रकरणी भाजप आंदोलन करणार आहे .
दिनांक 6/6/2022 रोजी मुंबई जनसता , तरुण भारत प्रतिनिधीना बोलावून भाजपा वार्ड 206 सातरस्ता , साईबाबा नगर, ना म जोशी नगर , सुभाष नगर च्या वेगवेगळ्या समस्या सांगितल्या . यावेळी वार्ड अध्यक्ष- नागेश तांबेडकर ,भाजपचे दक्षिण मुंबई जिल्हा महामंत्री दीपक सावंत, प्रवक्त्या – सौ आरती पुगावकर , जिल्हा उपाध्यक्ष – चंद्रक़ांत कारंडे, वरळी विधानसभा सचिव- सौ.संजना पाटणकर , वार्डचे उपाध्येक्ष – नरेश कनौजिया , शक्तिकेंद्र प्रमुख – दर्शन पुगावकर उपस्थित होते . स्थानिक नागरिक यांनि समस्या पत्रकारांच्या निदर्शनास आणल्या
.