ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

शरद पवार सरकार वाचवणार ?


मुंबई/ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर आता शरद पवार यांनी सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत त्यासाठी कायद्याची आणि रस्त्यावरच्या लढाईची सुधा आमची तयारी आहे असे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे . त्यामुळे हा संघर्ष वाढणार आहे दरम्यान काळ प्रथमच उद्वव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्वर हल्ला करताना मी मुख्यमंत्री असतानाही तुम्हाला नगरविकास खाते दिले आणखी काय हवे होते असा थेट सवाल केला आहे.
पाहिले चार दिवस बंडखोर गटा समोर असलेली शिवसेना काल आक्रमक झाली आणि एकनाथ शिंदेंसह 17 बंडखोरांचे अपात्र तेची कारवाई करण्याची मागणी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या कडे केली . तसेच काल उद्वव ठाकरे यानी मातोश्रीवर शरद पवार यांच्याशी चर्चा केली . आदित्य ठाकरे यांनीही शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला तर विधानसभा बंडखोर गटाने अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेतला आहे .शरद पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत बंडखोरांना इशारा दिला तसेच ते मुंबईत आल्यावर बघू असे म्हटले होते तर I उद्धव ठाकरे मुंबईतील सर्व विभाग प्रमुखांना आक्रमक होण्याचे आदेश दिले त्यानंतर काल मंगेश कुडाळकर आणि दिलीप लांडे या बंडखोर आमदारांच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला केला आणि त्यांचे बॅनर फाडले . कोल्हापुरातही आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला . एकीकडे शिवसेना आक्रमक झालीय तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यi मागे फौज उभी आहे मुंबईत सुधा आघाडी सरकारने वकिलांची फौज उभी केली आहे . त्यामुळे आता या दोन्ही गटात कायद्याची लढाई सुरू होणार आहे .

error: Content is protected !!