आदित्यच्या खास अधिकाऱ्यांचे बदली सत्र सुरू- पालिका प्रशासनात सेनेच्या वर्चस्वाला सुरुंग
मुंबई / राज्यात सतातर होताच सुडाच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. नव्या सरकार मधील नेत्यांनी शिवसेनेच्या वर्चस्वाखाली असलेल्या पालिकेतील अधिकाऱ्यांची जुण्यापदावरून उचलबांगडी करायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आदित्यच्या अगदी जवळचे अधिकारी अशी ओळख असलेल्या जी विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी के पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रंशात सकपाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर दिघावकर यांची ई विभागात बदली करण्यात आली आहे . आदित्य ठाकरे यांच्या मर्जीतले जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे डी विभागाचे सहाय्यक आयुक्त पदी बादली होण्याची शक्यता आहे . कारण आदित्यच्या काही प्रकल्पांना पूर्णत्वास नेण्यास या अधिकाऱ्यांनी मदत केली होती . त्यामुळे आता त्यांना हतबल जात आहे
4 जुलै रोजी पालिका आयुक्त चहल यांच्या स्वाक्षरीने तीन सहाय्यक आयुक्तांच्या बादल्या करण्या आल्या .दिघावकर यांच्या पाठोपाठ ई विभागाचे सहाय्यक आयुक्त मनीष वळुंज यांची के .पूर्व विभागात बदली करण्यात आली आता हे बदली सत्र सुरूच राहणार आहे .