पावूस आला मोठा..
यंदा उशिरा का होईना पाऊस चांगली सुरुवात झाली त्यामुळे शेतकरी सुखावला आहे पेरण्या सुरू झाल्यात पण पावसाचे रौद्र रूप पाहता या पावसात शेतीचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे.सध्या मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावूस धुमाळ घालतोय कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात तर रेड अलर्ट आहे.कोकणातील रस्ते आणि रेल्वेमार्ग पाण्याखाली गेल्याने त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय .कोकणात सर्वाधिक पावूस पडतो आणि प्रत्येक पावसाळ्यात अब्जावधी क्युसेस पाणी वाया जाते यावेळीही तसेच होणार आहे एकीकडे मराठवाड्यात आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यात पावसाअभावी शेतीची पाणी खोळंबली पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय तर दुसरीकडे कोकणातील पावसाचे पाणी वाया जातेय ही खरोखरच विचित्र परिस्थिती आहे मात्र सरकार त्यावर कोणतीही उपाययोजना करायला तयार नाही नद्याजोड प्रकल्पाच्या माध्यमातून कोकणातील वाया जाणारे पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्याची एक मोठी योजना तत्कालीन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांनी केली होती पण ती कागदावरच राहिली अशा महत्वाच्या प्रश्नांकडे सरकार कधीही गांभीर्याने पाहत नाही उलट हिंदुत्व ,दाऊद,हनुमान चालीसा अशा अनावश्यक विषयांकडे सरकारचे अधिक लक्ष आहे. नद्याजोड प्रकल्पाबाबत भाजप नेते काहीच बोलत नाहीत सरदार पटेल यांच्या पुतळ्यावर आणि पांढरा हत्ती ठरलेल्या बुलेट् .लाखो कोटींचे कर्ज कळले जाते पण नद्याजोड प्रकल्पासाठी कर्ज मिळत नाही ही खरोखरच संतापजनक बाब आहे
पावसाळ्यातील पाणी वय जाऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात धरणे बांधली आहेत पण जिथे पाऊस अधिक पडतो आणि मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते तिथे मात्र धरणे नाहीत कोकणात मोजकीच धरणे आहेत कोकणातील नद्या सह्याद्रीत उगम पावतात आणि अरबी समुद्राला मिळतात त्यांचे जलवाहन क्षेत्र 30728 किमी इतके आहे त्यामुळे कोकणातील शेतीला पाण्याचा तोटा नाही वैतरणा जगबुडी, काळं,वशिष्ठ, भगसाल,उल्हास,यासारख्या. मोठ्या नद्यांसह त्यांच्या अनेक उपनद्या आहेत आणि पावसाळ्यात त्या दुथडी भरून वाहत पण या नद्यांमधून वय जाणारे पाणी साठवण्याची पुरेशी यंत्रणाच कोकणात नाही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळून छोटी मोठी 101 धरणे आहेत पण पाणी साठा करण्याची त्यांची पुरेशी क्षमता नसल्याने पाणी वय जाते.त्यामुळे दुष्काळात पावसाच्या नावाने खडी फोडण्यापेक्ष आता जो मोठा पाऊस सुरू आहे त्याच्या वय जाणाऱ्या पाण्याचे नियोजन केल्यास महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल