ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कोषरी विरुद्ध संतापाची लाट

मुंबई – महाराष्ट्र आणि मराठी माणसांबद्दल काहींना काही वादग्रस्त बोलणाऱ्या राज्यपाल कोषारिनी.शुक्रवारी मुंबई आणि महाराष्ट्रावर केलेल्या वक्तव्याने पुन्हा चर्चेत आले आहेत. ‘गुजराती लोक मुंबईतून गेले तर पैसे राहणार नाहीत. आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे, ती राहणार नाही, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे. कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्राची माफी मागण्याची मागणी केली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत काल जे.पी. रोड, अंधेरी पश्चिम येथील दाऊद बाग जंक्शन येथील चौकाचा नामकरण व उदघाटन सोहळा संपन्न झाला. या चौक नामकरण सोहळ्याला खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, नितेश राणे, अमित साटम, भारती लवेकर व पंकज भोयर, नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा व उद्योजक विश्वस्त राकेश कोठारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी राज्यपाल कोश्यारी पुढे म्हणाले की, ‘गुजराती, राजस्थानी निघून गेले तर आर्थिक राजधानी मुंबई राहणार नाही.राजस्थानी मारवाडी समाजाने व्यवसाय करताना केवळ अर्थसंचय न करता शाळा,महाविद्यालये,
बांधली व गोरगरिबांची सेवा केली.राजस्थानी मारवाडी समाज देशात सर्वत्र तसेच नेपाळ,मॉरिशस आदी देशांमध्ये देखील आहे असे सांगून जेथे जेथे हा समाज जातो तेथे तो आपल्या स्वभाव व दातृत्वामुळे स्थानिक संस्कृतीशी एकरूप होतो.’भारत देश हा शूरवीरांच्या बलिदानामुळे तसेच दानशूर लोकांच्या दातृत्वामुळे मोठा आहे. त्याग,बलिदान व सेवा यामुळेच जनतेचे प्रेम मिळते आणि म्हणून सर्वांनी समाजासाठी आपले योगदान दिले पाहिजे, असेही राज्यपाल म्हणाले.

दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबई आणि महाराष्ट्रासंदर्भात वक्तव्य केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. ‘महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसल्या जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत.आपण मराठी माणसाचा अपमान केलाय महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा’.

error: Content is protected !!