ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

दसरा मेळाव्या वरून शिवसेना-शिंदे गटात राडा होण्याची शक्यता


मुंबई/ शिवसेनेच्या मलकिवरून सध्या शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष शिगेला पोचला आहे.दोघांमधील वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच दसरा मेळाव्यावरून दोन्ही बाजूंच्या नेत्यांमध्ये तू तू मैं मैं सुरू झाली आहे.त्यामुळे दसरा मेळाव्यावरून शिमग्यातील राडेबाजीची भीती व्यक्त केली जात आहे.
शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवाजी पार्कच्या मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा होतो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दसरा मेळाव्यातील भाषण ऐकण्यासाठी महाराष्ट्रातील लाखो शिवसैनिक त्या दिवशी शिवाजी पार्कच्या मैदानावर येतात .गेल्या 50 वर्षांच्या इतिहासात कधीही यात खंड पडला नाही शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे दसरा मेळाव्यात भाषण होते पण यावर्षी शिवसेनेत मोठी बंडखोरी झाली आणि शिवसेनेतील 40 आमदार फुटून शिंदे सोबत गेले त्यानंतर त्यांनी भाजपच्या मदतीने सरकार बनवले पण आता आमचीच खरी शिवसेना आहे असा दावा करून ते शिवसेनेवर हक्क सांगू लागले आहेत तसेच शिवसेनेचा दसरा मेळावा आम्हीच शिवाजी पार्कवर भरवणार असे शिंदे गटाकडून सांगितले जात आहेत तर दसरा मेळावा आम्हीच शिवतीर्थावर भरवनार असे उद्धव ठाकरे छातीठोकपणे सांगत आहेत त्यामुळे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही गटात शिमग्याची सुरुवात झाली असून एकमेकांच्या विरुद्ध बोंब मारायला त्यांनी सुरुवात केली आहे

error: Content is protected !!