शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवर अनधिकृत बांधकाम इतिहासाची साक्ष देणारा विशाळगड भूमाफियाच्या ताब्यात
राजापूर/ छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या बहाद्दर मावळ्यांनी. रक्ताचा एकेक थेंब सांडून जिंकलेले महाराष्ट्रातील गड किल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या पराक्रमाची आणि शिवशाहीचे मुक साक्षीदार आहेत.त्यामुळे हा इतिहासिक ठेवा जतन करण्याची जबाबदारी सरकारवर आहे पण पण शिवाजी महाराजांच्या नावाने दुकानदारी करणाऱ्या इथल्या राजकीय पक्षांना महाराजांच्या गडकिल्ल्यांचे काहीच पडलेले नाही त्यामुळे आज पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेले हे किल्ले भग्नावस्थेत आहेत.त्याला कुणी वाली नसल्याने या बेवारस किल्ल्यांवर आता भुंफियांचे अनधिकृत बांधकाम सुरू आहे . कोकणातील विशाळगड हा शिवाजी महाराजांच्या आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाचा साक्षीदार आहे कारण पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटलेला महाराजांनी विशाळगड गाठला होता आणि महाराज तिथवर जाईपर्यंत बाजी प्रभु देशपांडे आणि त्याच्या मावळ्यांनी छातीचा कोट करून पावनखिंड लढवली होती आणि विशाळगड वाचवला होता त्याच विशाल गडावर आता अनधिकृत झोपड्या, चार मजली मजिद उभ्या राहिल्या आहेत . तिथली जागा विकायची आहे असे तिथे फलक लावण्यात आले आहे कोणाची जागा आणि कोण विकणार विशाळगड हा काही कुठल्या राजकीय पुढाऱ्यांच्या किंवा भुमाफीया च्या बापाचा नाही म्हणूनच सरकारने आता तरी डोळे उघडावे 350 कोटी खर्च करून समुद्रात महाराजांचे स्मारक बांधणया ऐवजी हे गड किल्ले वाचवावे आणि त्यांचे सुशोभीकरण करावे अन्यथा हे पवित्र गडकिल्ले भूमाफिया हडप करतील आणि तिथे हिल्ल स्टेशन उभे करून त्यावर हॉटेल्स बांधून त्या हॉटेल मध्ये बाया नाचवतील
गडावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूस खोपटी बांधून जागा अडवण्याचा प्रकार दिसतोय हे दिवसेंदिवस वाढतच जाणार यात शंका नाही , गडावर अनेक शिवकालीन मंदिरे तसेच काही समाध्या आहेत अर्थात गळक्या अवस्थेत जीर्ण झालेल्या स्थितीत परंतु एक चार मजली मस्जिद मात्र अगदी नवीन बांधकामातील दिसते ती कशी काय . ती शिवकालीन असल्याचे पुरावे आहेत का ..
पुरातत्व खातं नेमकं काय करते ?
13 जुलै 2022 रोजीच विशालगडाच्या बुरुजाचा एक भाग सुद्धा ढासळला अजूनही काही भाग ढासळण्याच्या स्थितीत आहे.
स
▪️ राज्य पुरातत्व विभाग
▪️ केंद्रीय पुरातत्व विभाग
▪️ महसूल विभाग
▪️ वनविभाग
▪️ सांस्कृतिक विभाग
▪️ पर्यटन विभाग
▪️ स्थानिक पोलीस मुख्य प्रशासन
यांनी उत्तरे सादर करातील काय?
य
*म
ज