हिंमत असेल तर निवडणूक घेऊन दाखवा- अमित शहांना उद्धव ठाकरेंचे खुले आव्हान
मुंबई/ महाराष्ट्रावर आदिलशहा निजामशहा असे कितीतरी शहा येऊन गेले त्यामुळे हा महाराष्ट्र कुठल्याही शहाणा घाबरत नाही हिंमत असेल तर मुंबई महापालिकेची निवडणूक एका महिन्यात घेऊन दाखवा असे अमित शहा यांना जाहीर आव्हान उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
काल गोरेगाव येथे शिवसेना गट प्रमुखांच्या बैठकीत बोलताना शिंदे गटाचा उल्लेख मींधे गट असा केला तसेच भाजप आणि शिंदे गट यांच्यावर तुफान टीका केली मुंबईत पूर्वी मुळे पळवणारी टोळी होती आता बाप पाळवणारी टोळी आली आहे .ज्यांना सत्ता पैसा आणि खूप काही दिले ते गद्दार निघाले त्यामुळे ते गेले ते बरे झाले मात्र शिवसेना आजही मजबूत आहे . निवडणूक आली की मुंबईवर गिधाडे घिरट्या घालतात सध्या अशीच गिधाडे घिरट्या घालीत आहेत पण त्यांना मुंबईकर जनते चा मनाचा अंदाज नाही संकटात मुंबईला शिवसेनेने वाचवले आहे . त्यामुळे सर्व जाती धर्माचे लोक शिवसेनेच्या बाजूने आहेत असेही त्यांनी सांगितले .