ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

राज्यपालांच्या हस्ते ११४ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना  राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

राजभवन येथे २०२० व २०२१ वर्षांकरिता पोलीस अलंकरण समारोह संपन्न  

राज्यातील ११४ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचा-यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या  हस्ते गुरुवारी (दि. १३) पोलीस शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.  
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजभवन मुंबई येथे झालेल्या पोलीस अलंकरण सोहळ्यामध्ये २०२० च्या स्वातंत्र्य दिनी तसेच २०२१ च्या प्रजासत्ताक दिनी जाहीर झालेली पोलीस पदके देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक दिवंगत प्रकाश नरेश येरम व सहायक पोलीस उपनिरीक्षक दिवंगत राजू इरप्पा उसेंडी यांना मरणोपरांत सन्मानित करण्यात आले.  

सत्तावीस (२७) पोलीस अधिकारी व जवानांना पोलीस शौर्य पदक प्रदान करण्यात आले, तर ९ पोलीस अधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले.  अठ्ठयात्तर (७८) पोलीस अधिकारी व जवानांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके प्रदान करण्यात आली.
 
पोलीस अलंकरण समारोहाला पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) आनंद लिमये तसेच पोलीस अधिकारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व गौरविण्यात आलेल्या  पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
 
पोलीस शौर्य पदक २०२०

पोलीस निरीक्षक राजेश ज्ञानोबा खांडवे,  पोलीस हवालदार मनीष पुंडलीक गोरले, पोलीस नाईक गोवर्धन जनार्दन वाढई, पोलीस नाईक कैलास काश‍ि राम उसेंडी, पोलीस नाईक कुमारशहा वासुदेव किरंगे, पोलीस श‍िपाई शिवलाल रुपसिंग हिडको, सहायक पोलीस उप निरीक्षक राकेश रामसू हिचामी, पोलीस श‍िपाई वसंत नानका तडवी, पोलीस श‍िपाई सुभाष पांडूरंग उसेंडी, पोलीस श‍िपाई रमेश वेकन्ना कोमीरे, सहायक पोलीस उप निरीक्षक सुरेश दुर्गूजी कोवासे,  सहायक पोलीस उप निरीक्षक रतिराम रघुराम पोरेटी, पोलीस हवालदार प्रदीपकुमार रायभान गेडाम, पोलीस हवालदार राकेश महादेव नरोटे,

पोलीस शौर्य पदक २०२१

आर. राजा, पोलीस उप आयुक्त‍, नागनाथ गुरुसिध्द पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, महादेव मारोती मडावी,  पोलीस हवालदार, कमलेश अशोक अर्का, पोलीस नाईक, अमुल श्रीराम जगताप, पोलीस नाईक, वेल्ल कोरके आत्राम पोलीस नाईक, हेमंत कोरके मडावी, पोलीस शिपाई, सुधाकर मलय्या मोगलीवार, पोलीस शिपाई, बियेश्वर विष्णू गेडाम, पोलीस  श‍िपाई, हरि बालाजी एन, पोलीस उप आयुक्त, निलेश मारोती ढुमणे, पोलीस हवालदार, गिरीश मारोती ढेकले, पोलीस शिपाई, गजानन दत्तात्रय पवार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांना पोलीस शौर्य पदकांनी सन्मानित करण्यात आले.
 
उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रीय पोलीस पदक २०२०

अपर पोलीस महासंचालक र‍ितेश कुमार, अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) संजीव कुमार सिंघल, सहायक पोलीस आयुक्त  सुषमा शैलेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक  विजय पोपटराव लोंढे, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगन्नाथ म्हेत्रस तसेच २०२१ साठी अपर पोलीस महासंचालक  प्रभात कुमार, अपर पोलीस महासंचालक सुखविंदर सिंह, (सेवानिवृत्त) सहायक पोलीस आयुक्त निवृत्ती तुकाराम कदम, (सेवानिवृत्त) सहायक पोलीस आयुक्त विलास बाळकू गंगावणे यांना उल्लेखनिय सेवेबददल राष्ट्रपती पोलीस पदकांनी सन्मानित करण्यात आले.
 
गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक.
 

error: Content is protected !!