ग्राम पंचायत निवडणुकीत -महाविकास आघाडीची सरशी -शिंदे पेक्षा ठाकरेंना यश
एकूण ग्राम पंचायती 1165
महा विकास आघाडी 451
भाजप शिंदे युती 352
भाजप 239,राष्ट्रवादी 155,शिवसेना 153,काँग्रेस 143 शिंदे गट 113,अपक्ष 295
मुंबई/ गेल्या रविवारी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 239 जागा जिंकल्या असून अपक्षणी 295 जागा मिळवल्या आहेत. मात्र शिंदे गट भाजप युती पेक्षा शिवसेना,काँग्रेस,आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीने 451 जागा जिंकून सत्ताधारी आघाडीला मागे ढकलले आहे तर शिवसेनेचां दोन गटापैकी ठाकरे गटाला मोठे यश मिळाले आहे तर शिंदे गट खूपच मागे पडला आहे .
18 जिल्ह्यातील 1165 ग्राम पंचायती साठी रविवारी 74 टक्के मतदान झाले होते त्याचा आज निकाल लागला .यात सर्वाधिक 239 जागा भाजपने जिंकल्या तर अपक्षणा 2995 जागी झेप घेतली यात काही ठिकाणी सर्वपक्षीय आघड्यांचा समावेश होता.रायगड मध्ये शिंदे गटाने बऱ्यापैकी यश मिळवले असेल तरी शिंदे गटाचे नेते भरत गोगावले काळीज खरवली गावातील ग्राम पंचेतीवर मात्र महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे तोच प्रकार भंडारा जिल्ह्यातील नाना पटोले यांच्या गावात झाला त्यांच्या ग्रामपंचायती मध्ये काँग्रेसचा पराभव झाला तिथे भाजपचा झेंडा फडकला .कोकणात ठाकरे गटाने बाजी मारली मंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे तर सिंधुदुर्गात भाजप आणि महाविकास आघाडीला समिश्र यश मिळाले तर कल्याण मध्ये महाविकास आघाडीने बाजी मारली 7 पैकी 2 बिनविरोध तर 4 महाविकास आणि 3 जागा भाजपला मिळाल्या पालघर मध्ये बहुजन विकास आघाडीने बाजी मारली तर नंदुरबार मध्ये भाजपने बाजी मारली विदर्भातील नागपूर मध्ये भाजप आणि काँग्रेस मध्ये काटेकी टक्कर होती. उत्तर महाराष्ट्राच्या नाशिक,जळगाव,धुळे नंदुरबार आदी जिल्ह्यातील बहुतेक ग्राम पंचायती भाजपकडे गेलं,या तर ,मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे वर्चस्व राहिले .