’सायना’ एकदा पहा
अमोल गुप्ते दिग्दर्शित ’सायना’ एकदम भारी नाही, पण चांगला आहे.स्पोर्ट्स फिल्म्सचा एक साचा बनलाय. त्याच्या बाहेर तो गेलेला नाही. मध्ये मध्ये त्यातील नाट्यात्मकता कमी पडते. सायनाच्या मनातली घालमेल, उलघाल अधिक उत्कटतेने प्रसंगांतून प्रकट होणे आवश्यक होते. तरीदेखील मेघना मलिक, शुभ्रज्योती बरत आणि खास करून मानव कौलची कामे मस्त आहेत. सायनाच्या आईच्या भूमिकेतली मेघना मलिक रोलमध्ये प्रथमपासून जी घुसली आहे, ती शेवटपर्यंत! मानवचा अभिनय नेहमीच व्यक्तिरेखेचे अंतरंग उलगडून दाखवणारा.सूक्ष्म. मानव नाटक आणि सिनेमा दोन्हींत धमाल करून राहिलेला आहे. मेरी प्यारी बिंदू, संदीप और पिंकी फरार या मागोमाग ’सायना’द्वारे परिणीती चोप्रा आता आपले करिअर गंभीरपणे घेत असल्याचे दिसते. खेळाचे चित्रीकरण करणे हे छायालेखक आणि संकलक दोघांच्याही दृष्टीने आव्हानात्मक असते. हे काम देखील या सिनेमात बेहतरीन झाले आहे. चित्रपटाच्या काही मर्यादा असल्या, तरी ’सायना’ एकदा बघितलाच पाहिजे.-