ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

तर नारायण राणे ५० वर्ष तुरुंगातून बाहेर येणार नाही- संजय राऊत यांचा राणेंना इशारा

मुंबई – नारायण राणे माझ्या नादाला लागला तर त्याची अशी काही प्रकरणे माझ्याकडे आहेत कि तो त्या प्रकरणात आत गेल्यास ५० वर्ष बाहेर येणार नाही असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे

भाजापा नेते व केंद्रीयमंत्री नारायण राणे आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते व खासदार संजय राऊत यांच्यातील वाद आता टोकाला जाण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. संजय राऊतांविरोधात आपण तक्रार दाखल करणार असल्याचा नारायण राणेंनी इशारा दिल्यानंतर, संजय राऊतांनीही राणेंविरोधात आक्रमक भूमिका घेत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना थेट एकेरी भाषेतच त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या दैनिकातील अग्रलेखावरून राणेंनी संजय राऊतांना इशारा दिला आहे. त्याला संजय राऊतांनी उत्तर दिले आहे.

या पार्श्वभूमीवर संजय राऊत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले, “पादरा पावटा आहे तो बाळासाहेबांच्या भाषेत, पादरा माणूस आहे. आतापर्यंत मी त्याच्याविषयी काही बोललो नाही, हा सगळ्यांना अरे तुरे करतो हा कोण आहे ? मुख्यमंत्र्यांना अरे तुरे, कालपर्यंत एकनाथ शिंदेना अरे तुरे करत होता. जुने व्हिडीओ काढा त्यात मोदींनाही अरे तुरे. हे कोण आहेत, यांची चौकशी करा. आता मी करणार, आता मी काढतो. कालपर्यंतमी संयमाने वागलो, इतके वर्षे मी. पण तुम्ही जर रोज आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आम्ही सगळे, फडणवीस, अशोक चव्हाण, अहमद पटेल, सोनिया गांधी, मोदी सगळ्यांवरती अरे तुरे, अरे तुरे कोण तुम्ही? डरपोक लोक आहात तुम्ही. तुम्ही पळून गेलात तुमच्या किरीट सोमय्यांनी तुमच्यावर जे आरोप केलेत, त्यावर उत्तर दिलं का तुम्ही? कुठंय किरीट सोमय्या आता? तुमच्या १०० बोगस कंपन्या आणि इतर सगळं बाहेर काढतो आता मी.”

error: Content is protected !!