ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेमुंबई

अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनमार्फत – कुर्ल्यात पोलिसांसाठी शिबिर आयोजित

कुर्ला -अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने दिनांक १३.१.२०२३ रोजी पोलीस चौकी बीट नंबर ३ येथे आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट कार्ड (आभा कार्ड) व नेत्र तपासणी शिबिरे आयोजित केली होती.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बागुल – चुनाभट्टी डिव्हिजन यांनी रस्ता सुरक्षा सप्ताह(दिनांक ११.१.२०२३ ते
१७.१.२०२३) च्या अनुषंगाने वरील नमूद दोन शिबिरे घेण्यासाठी विनंती केल्याने सदर शिबिरे आयोजित करण्यात आली.सुमारे १०० हुन अधिक पोलीस कर्मचारी/अधिकारी व स्थानिक नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेतला.
आभा कार्ड हे डिजिटल कार्ड असून त्या मध्ये प्रत्येक लाभार्त्याची वैद्यकीय माहिती डिजिटल स्वरूपात संग्रहित असते.नेत्र तपासणी वर्षातून दोनदा आवश्यक असते व फौंडेशन ही सेवा विनामूल्य प्रदान करते.
पोलीस हे रात्रंदिवस कार्यरत असतात .त्यांच्या प्रति सेवाभाव असणे आपले कर्तव्य आहे” असे मत फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अश्विन मलिक मेश्राम व्यक्त केले .

error: Content is protected !!