ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

मोदींच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत बदल २ तास मेट्रो बंद

मुंबई – मोदींच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला असून सुरक्षेच्या कारणास्तव २ तास मेट्रो बंद ठेवण्यात येणार आहे . त्यामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची गैरसोय होणार आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. भाजप आणि शिंदे गटाने बैठका घेऊन त्यांच्या स्वागताची तयारी केली आहे. पण दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी मुंबई पोलिसही सुरक्षेच्या दृष्टीने सज्ज झाले आहे. प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. त्याशिवाय काही मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे. घाटकोपर-वर्सोवा मेट्रो काही कावालधीसाठी बंध असणार आहे.

गुरुवारी तुमची फ्लाइट चुकवायची नसेल तर तुम्हाला विमानतळावर लवकर जावं लागणार आहे. कारण व्हीव्हीआयपी मुव्हमेंटमुळे मुंबईच्या रस्त्यावर दुपारी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत जड वाहतूक असेल. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, सांताक्रूझ जोगेश्वरी लिंक रोड, ईस्टर्न एक्स्प्रेस रोड आणि इतर रस्त्यांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे जर तुम्ही मुंबई आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत विमानतळावरून उड्डाण घेण्याचा विचार करत असाल तर कोणतीही रहदारी टाळण्यासाठी लवकर पोहोचाव लागेल.

बीकेसी आणि गुंडवली मेट्रो स्थानक येथील उद्याच्या नियोजित सार्वजनिक कार्यक्रमामुळे सव्वा चार ते साडे पाच या वेळेत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दक्षिण वाहिनी (कुलाबाकडे) तसेच५. ३० ते ५ . ४० या वेळेत उत्तरवाहिनी (दहिसरकडे) वाहतुक संथ गतीने सुरू असेल. नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी असं मुंबई वाहतूक पोलीसांनी ट्विट करून सांगितलं आहे. त्याशिवाय नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. वाहतूक विभागाच्या अधिकृत माध्यमांवरून मिळालेली माहितीच प्रमाण मानावी. आपल्याला कोणतीही समस्या अथवा शंका असल्यास आमच्याशी हेल्पलाईन क्रमांक अथवा ट्विटरवर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केलेय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एम एम आर डी ए मैदान आणि मेट्रो सात मार्गिका गुंदवली आणि मोगरापाडा स्थानका दरम्यान ड्रोन, पॅरागलाईडर आणि रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट उडवण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मोदींच्या दौर्याच्या दिवशी म्हणजेच गुरवारी सदर क्षेत्र उड्डाण प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे, मुंबई पोलिसांकडून याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत.

error: Content is protected !!