ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

काँक्रीटच्या रस्त्यांमुळे टक्केवारीची दुकानदारी बंद- फडणवीस, शेलार यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल


मुंबई -सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या आदित्य ठाकरेंवर आज फडणवीस आणि आशिष शेलार या भाजप नेत्यांनी जोरदार प्रतिहल्ला केला. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांमुळे टक्केवारीची दुकानदारी बंद होतील याची ठाकरेंना भीती वाटतेय म्हणून त्यांची आदळ आपट सुरु आहे असे फडणवीस यांनी सांगितले तर २५ वर्षात २२ हजार कोटी खर्च करून मुंबईकरांना खड्डे तुम्ही दिलेत असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे

प्रसारमाध्यमांशी बोलताना आशिष शेलार म्हणाले, “आदित्य ठाकरेंच्या टीकेमध्ये काही तथ्य नाही. केवळ स्वत:कडे लक्ष केंद्रित करून घेण्यासाठी हे सुरू आहे. २५ वर्षांमध्ये डांबरीकरणाच्या रस्त्यात आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने २२ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. २५ वर्षांत २२ हजार कोटी खर्च करून मुंबईकरांना खड्डे तुम्ही दिलेत. या खड्ड्यातले मृत्यू तुम्ही दिलेत. या खड्ड्यातील अपघात तुम्ही दिले आहेत. आता ३०-४० वर्ष टिकणारी सिमेंट, काँक्रिटचे रस्ते होताय आणि त्यामध्येही दायित्व कालावधी २० वर्षांचा आहे. काही किंमत ही २० वर्षांत त्यांना दिली जाणार आहे. अशा स्वरुपाच्या कंत्राटाच्या प्रक्रियेतील ही पारदर्शकता आहे आणि म्हणून हे पोटातलं दुखणं आहे.”
आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील ४०० किलोमीटर सिमेंट-काँक्रिट रस्त्यांच्या कंत्राटावरून शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे. ४०० किलोमीटर रस्त्यांचा प्रस्ताव कोणी मांडला आहे. ६००० कोटी रुपयांचं काम प्रशासकाने मंजूर करणे कितपत योग्य आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात काम होत असताना कोठेही लोकप्रतिनिधींना विचारण्यात आलं नाही. हा प्रत्येक पक्षातील नगरसेवकांचा अपमान आहे. असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

error: Content is protected !!