ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

तुर्कस्थान सिरीया मध्ये भयानक भूकंप- ४ हजार ठार १६ हजार जखमी


आरावा- सोमवारी पाहते ४ वाजता तुर्कस्थान आणि सीरिया मध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपात ४ हजाराहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत तर १६ हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत केवळ तुर्की आणि एरियात नव्हे तर लेबनॉन, सायप्रस,इस्त्राईल सह ९ देशांना भूकंपाचे धक्के बसले आहेत तारांकित २४ तासात ३९ छोटे मोठे भूकंपाचे धक्के बसले त्यातील पहाटेचा ४ .१७ रिक्टर स्केलचा दुसरा ७. ५ रिश्टर स्केल तर तिसरा संध्याकाळी ६.० रिश्टर एक मोठा भूकंप झाल्यानंतर त्यानंतर इतर काही लहान-लहान भूकंपांची मालिका सुरू होते. तुर्कीमध्येही पहाटे ७ . ८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला, त्याची डेप्ट ही 18 किमीची होती. त्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. गाझियनटेप हे भूकंपस्थानापासून सीरिया हा देशही जवळ आहे. त्यामुळे या भूकंपाची तीव्रता तुर्की आणि सीरियामध्ये जाणवली असून त्यामध्ये आतापर्यंत १४०० हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे.
तुर्कीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत असताना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मदतकार्य सुरू झालं आहे. एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तुर्कीसह सीरियामध्ये शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. या भूकंपाचा फटका सर्वच प्रमुख शहरांना बसल्यामुळे जनजीवनही विस्कळीत झालं आहे. अजूनही अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती आहे. त्यामुळे बचाव आणि मदतकार्य मोठ्या प्रमाणावर चालवले जात आहे.
भूकंपाच्या पार्श्वभूमीवर तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी तातडीची बैठक घेतली, त्यामध्ये भूकंपग्रस्तांना शक्य ती सर्व मदत देण्याचे आदेश दिले आहेत. अनेक देश आपत्तीग्रस्त तुर्कीला मदत करणार आहेत. या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे.
युरोपातील एका शास्त्रज्ञाने या भूकंपाचा अंदाज तीन दिवसांपूर्वी वर्तवला असल्याची माहिती आहे. नेदरलँडचे शास्त्रज्ञ फ्रँक हॉगरबिट्स यांनी 3 फेब्रुवारीला याबाबत ट्वीट केले होते. ते म्हणाले होते की आज नाही तर उद्या, पण लवकरच या भागात ७ . ५ रिश्टर स्केलचा भूकंप येणार आहे. शास्त्रज्ञ फ्रँक हॉगरबाइट्स यांनी केलेल्या ट्विटमध्ये ७ . ५ तीव्रतेचा भूकंप दक्षिण-मध्य तुर्की, जॉर्डन, सीरिया आणि लेबनॉनला प्रभावित करेल असं म्हटलं आहे.

भूकंपाच्या दरम्यान तुर्कस्तानच्या अनेक भागात तापमान शून्याच्या खाली नोंदवण्यात आले आहे. सध्या देशात कडाक्याची थंडी पडत आहे. भूकंपामुळे येथील विमानतळाच्या धावपट्टीचे नुकसान झालं आहे. बर्फवृष्टीमुळे बचाव कार्यातही अडचण निर्माण झाली आहे.

error: Content is protected !!