ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

दादर मध्ये मनसे विरूद्ध शिवसेना पुन्हा संघर्ष उफळणार

मुंबई/ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शहराच्या प्रमुख भागात नाका तिथे शाखा ही संकल्पना राबवण्याचा आपल्या कार्यकर्त्यांना आदेश दिला होता त्यानुसार मनसेचे कार्यकर्ते तयारीला लागले आहेत.त्यानुसार शिवसेना ठाकरे गटावर दबाव वाढवण्यासाठी मनसेने सेना भवनाच्या जवळ असलेल्या जिप्सी हॉटेल जवळ शाखा उघडण्याचा निर्णय घेतला असून राज ठाकरे यांच्या १४ जून रोजी वाढ दिवशी स्वतः राज ठाकरे या शाखेचे उद्घाटन करणार असल्याचे समजते
दरम्यान हा संपूर्ण परिसर शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि या पूर्वी सुधा या भागात माणसे विरूद्ध शिवसेना यांच्यात राडेबाजी झाली होती त्यामुळे आता या भागात मनसेची शाखा निर्माण होत असल्याने या दोन्ही पक्षात पुन्हा राडेबाजी होण्याची शक्यता आहे कारण या दोन्ही पक्षात प्रचंड वाद आहे आणि राज ठाकरे सध्या भाजपच्या बाजूला झुकलेले असल्याने हा वाद आणखी चिघळलेला आहे.

error: Content is protected !!