सीमा हैदर व तिच्या प्रियकराची युपीएटीएस कडून ६ तास चौकशी
नोएडा – पाकिस्तानातून ४ मुलांसह भारतात आलेली आणि भरती नागरिक सचिन मीना याच्याशी विवाह करून त्याच्या घरी राहणारी पाकिस्तानी नागरिक सीमा हैदर हिची आज युपी एटीएसने ६ तास कसून चौकशी केली
पाकिस्तानातून सीमापार करुन प्रियकराला भेटायला आलेली चार मुलांची आई सीमा हैदरचे प्रकरण सध्या देशात फार चर्चेत आहे. याप्रकरणी चित्रकूट येथील तुलसी पीठाधीश्वर जगदगुरू पद्मविभूषण रामभद्राचार्य महाराज यांनी मोठे वक्तव्य केले होते. या लोकांना काही कळतच नाही. इतक्या वाईट या महिला असतात, यांना लक्षात येत नाही, अशा महिलांपासून भारतीयांना सावध असले पाहिजे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. दरम्यान, यानंतर आता हिंदू संघटनांनीही तिला धमकी दिली आहे.
अनेक हिंदू संघटनांनी तिला ती पाकिस्तानी जासूस असल्याचा आरोप केला आहे. यामुळेच आज ग्रेटर नोएडाचे गौरक्षा दलचे राष्ट्रीय अध्यक्ष वेद नागर यांनी सीमा हैदरला ७२ तासांत पाकिस्तानात पोहोचवण्याची अपील केली आहे. तसेच असे न झाल्यास सर्व हिंदू संघटनांच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात येईल, असे ते म्हणाले. गौरक्षा दलचे राष्ट्रीय अध्यक्ष वेद नागर यांनी यासंबंधीचा एक व्हिडिओ जारी केला आहे